Ad will apear here
Next
पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात डॉ. रंगनाथन जयंती
डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना प्राचार्य डॉ. एस. ए. पाटील, ग्रंथपाल एस. बी. लोंढे यांसह सर्व विभागप्रमुख.सोलापूर : ‘ग्रंथालय शास्त्राचे आद्य प्रवर्तक म्हणून डॉ. एस. आर. रंगनाथन यांना ओळखले जाते. १२ ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस ग्रंथपाल दिन म्हणून साजरा करतात. भारताला ग्रंथालय क्षेत्रात जागतिक प्रतिष्ठा प्राप्त करून देणाऱ्या डॉ. रंगनाथन यांचा ग्रंथालयाच्या विकासात मोठा वाटा आहे. देशातील सर्वसामान्यांना ज्ञानाची कवाडे विनामूल्य खुली करण्याचा विचार सर्वप्रथम डॉ. रंगनाथन यांनी रुजवला. तो जोपासण्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य झिजवले,’ असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. एस. ए. पाटील यांनी केले.

ए. जी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात डॉ. रंगनाथन यांची १२५वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी उपप्राचार्य प्रा. व्ही. व्ही. पोतदार व प्रत्येक विभागाचे प्रमुख उपस्थित होते. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ए. जी. पाटील, सेक्रेटरी एस. ए. पाटील, कॅम्पस डायरेक्टर डॉ. एम. ए. चौगुले यांचे मार्गदर्शन लाभले.

उपप्राचार्य प्रा. व्ही. व्ही. पोतदार म्हणाले, ‘डॉ. एस. आर. रंगनाथन यांचा जन्म १२ ऑगस्ट १९८२ रोजी तत्कालीन मद्रास प्रांतातील तंजावर जिल्ह्यातील शियाली गावात झाला. १९३०च्या दशकात डॉ. रंगनाथन यांनी ग्रंथालयशास्त्राचे कोलन क्लासिफिकेशन, क्लासिफाइड कॅटलॉग कोड, प्रोलेगोमिना टू लायब्ररी क्लासिफिकेशन, थिअरी ऑफ लायब्ररी व रेफरन्स सर्व्हिस अँड बिब्लिओग्राफी या पाच सूत्रमय ग्रंथांचे लेखन व प्रकाशन करून ते दशक विशेषत्वाने क्रांतिकारी ठरवले. १९३१मध्ये प्रथम मद्राससाठी ‘लायब्ररी बिल’तयार केले. ग्रंथालयशास्त्रातील प्रमाणपत्र, तसेच पदविकास्तरातील अभ्यासक्रमाचे प्रारूप तयार केले आणि ग्रंथालयशास्त्र शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.’

ग्रंथपाल एस. बी. लोंढे यांनी सूत्रसंचालन केले. टीपीओ विभागप्रमुख प्रा. एस. व्ही. पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ग्रंथपाल श्री. लोंढे, टीपीओ विभागप्रमुख प्रा. पाटील, बी. डी. हिरेमठ, एस. एस. माड्याळ, एस. एस. जाधव यांनी परिश्रम घेतले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZLJBF
Similar Posts
ए. जी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यशाळा सोलापूर : बेंगळुरू येथील ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ संस्थेने सोलापूरमधील ए. जी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात एक कार्यशाळा आयोजित केली होती. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे विशाखा परुळेकर व सुमित शिर्के यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.
पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात तज्ञांचे मार्गदर्शन सोलापूर : ए. जी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांसाठी ‘स्पर्धा परीक्षांची तयारी’ या विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. या वेळी येथील ड्रीम फाउंडेशनचे व्यवस्थापक काशिनाथ भतगुणकी यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी,
सृजनरंग नियतकालिक स्पर्धेत ‘ऑर्किड ऑरा’ सर्वप्रथम सोलापूर : सोलापूर विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या सृजनरंग व्यावसायिक नियतकालिक स्पर्धेत एन. के. ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘ऑर्किड ऑरा २०१७’ला सर्वोत्कृष्ट नियतकालिक म्हणून गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा व विद्यार्थ्यांमधील लेखक चिरंतन रहावा, यासाठी महाविद्यालय
पंढरपूरच्या विकासासाठी कॅनडाचे दोन हजार कोटी पंढरपूर : ‘शहराच्या विकासासाठी कॅनडा सरकारने आर्थिक साह्य करण्याची घोषणा केली आहे. कॅनडा सरकारने दोन हजार कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला आहे,’ अशी माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी दिली. भारत आणि कॅनडा सरकारच्या मैत्रीला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने परदेशी शहराच्या धर्तीवर

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language